Homeताज्या बातम्या

अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाजलहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलनाची मागणी

नांदेड शहरातील अरुंद गल्ल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये घरगुती कचरा संकलनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, या भागांसाठी स्वतंत्रपण

गोकुंदा ग्रामपंचायतीचा ’कचरा’ कारभारउच्चशिक्षितांच्या हाती सत्तेच्या चाव्या, पण जनतेच्या नशिबी मात्र दुर्गंधीचीच माया!
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
बीडमधील सुभाष रोडवरील नाल्याची डॉ.सारिकाताई क्षीरसागरांकडून पाहणीतत्काळ स्वच्छता करण्याच्या बीड न.प.प्रशासनाला सूचना
आपल्या विभागातील कचराच आपली डोकेदुखी बनलाय. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आणि  त्याची दुर्गंधी... अजून किती दिवस सहन करायचं? आपल्या वॉर्डला काय ...



नांदेड शहरातील अरुंद गल्ल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये घरगुती कचरा संकलनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, या भागांसाठी स्वतंत्रपणे लहान हातरिक्षा, पॅडल रिक्षा अथवा पॅडल ट्रायसायकलद्वारे कचरा संकलन सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शहरातील अनेक अरुंद गल्ल्यांमध्ये मोठी कचरा वाहने पोहोचू शकत नसल्याने घराघरांतून नियमित कचरा संकलन होत नाही. परिणामी विविध भागांमध्ये कचर्‍याचे ढीग साचत असून अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 16 मध्ये पूर्वी लहान हातरिक्षांच्या माध्यमातून दररोज कचरा संकलन केले जात होते. त्यामुळे परिसर स्वच्छ राहत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही व्यवस्था बंद झाल्याने परिस्थिती बिघडली असून अनेक गल्ल्यांमध्ये कचरा साचण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉ. यादव यांनी लक्ष वेधले की, साचलेल्या कचर्‍यामुळे डास, माश्या आणि उंदरांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड, अतिसार आणि कॉलरा यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. तसेच काही भागांमध्ये घरांवरील क्यूआर कोड स्कॅन करून प्रत्यक्ष कचरा न उचलता केवळ नोंदी दाखवल्या जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत घराघरांतून कचरा संकलन करणे बंधनकारक असल्याची आठवण करून देत, अरुंद गल्ल्यांसाठी स्वतंत्र कचरा संकलन यंत्रणा उभारणे, साचलेला कचरा तातडीने हटविणे, विशेष स्वच्छता मोहीम राबविणे आणि या कामासाठी जबाबदार अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS