आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त किनवट येथील दिवाणी न्यायालयात 20 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजता विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तालुका विधी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त किनवट येथील दिवाणी न्यायालयात 20 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजता विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका विधी सेवा समिती, किनवट तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, किनवट यांच्या वतीने याबाबतचे पत्र अभिवक्ता संघ, न्यायालय किनवट यांना पाठविण्यात आले आहे. 21 जून रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने योग दिनाचा कार्यक्रम 20 जून रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या योग शिबिरात न्यायालयीन कर्मचारी, वकील तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचे महत्त्व जाणून घ्यावे व आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर किनवट यांनी केले आहे. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS