Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नीट पेपर लीक प्रकरण : नांदेडमध्ये ’बसव ब्रिगेड’ आक्रमक; खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्याची आणि बायोमेट्रिक हजेरीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

‘नीट’ 2026 परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना, नांदेडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ‘बसव ब्रिगेड (अखि

नीट पेपर लीक प्रकरणात अडकलेले आरसीसीचे मोटेगावकर आणि काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, राजकीय चर्चांना उधाण!
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणार्‍यांना कठोर शिक्षा द्या; मोटेगावकरांवर मकोका लावून आरसीसी कायमचे बंद करण्याची मागणीनीट पेपरफुटी प्रकरणाने नांदेड हादरले; सर्व मोठ्या कोचिंग क्लासेसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
नीटची तयारी की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?पेपरफुटी प्रकरणाने ‘लातूर पॅटर्न’वरच संशयाची सावली; आरसीसी कोचिंगचे संचालक सीबीआयच्या ताब्यातनांदेडमध्येही धाडसत्र, कोचिंग कार्यालयांना टाळे; हजारो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण



‘नीट’ 2026 परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना, नांदेडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ‘बसव ब्रिगेड (अखिल भारतीय लिंगायत युवा मंच)’ या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत सक्तीची करण्याची मागणीही करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, नीट पेपर लीक प्रकरणात ‘आरसीसी’ इन्स्टिट्यूटचे प्रा. मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली असून, त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सराव परीक्षेतील अनेक प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याने खाजगी कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्याची भावना संघटनेने व्यक्त केली. संघटनेने जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावरही बोट ठेवले आहे. नियमांनुसार विद्यार्थ्यांची 80 टक्के उपस्थिती आवश्यक असली तरी प्रत्यक्षात महाविद्यालये ओस पडलेली असून विद्यार्थी फक्त कोचिंग क्लासेसमध्येच उपस्थित राहत असल्याचा आरोप करण्यात आला. शासन प्राध्यापकांवर लाखो रुपये खर्च करत असताना महाविद्यालयांमध्ये अध्यापनासाठी विद्यार्थीच नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. बसव ब्रिगेडने प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्व खाजगी कोचिंग क्लासेसची चौकशी करून कारवाई करणे, महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करणे, क्लासेसचे आर्थिक लेखापरीक्षण करणे आणि शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे यांचा समावेश आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या निवेदनावर बसव ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष शंकरराव पाटील घोडके, जिल्हाध्यक्ष (नांदेड दक्षिण) रत्नाकर पाटील कुन्हाडे, जिल्हाध्यक्ष (नांदेड उत्तर) ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष राजू बोंबले, प्रसिद्धी प्रमुख महारुद्र काळेकर, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कविराज केदारे, विद्यार्थी आघाडीचे महानगर अध्यक्ष आदित्य घोडके आणि व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष केशव खिचडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS