लहान येथील कै. दिगंबरावजी देवडे व छत्रपती माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

लहान येथील कै. दिगंबरावजी देवडे व छत्रपती माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी आदित्य देवडे, संस्थेचे उपाध्यक्ष बालासाहेब देवडे तसेच पत्रकार सुभाषराव लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. इयत्ता 10 वीतील गुणवंत विद्यार्थी कु. सोनाक्षी गंगाधरे – 88.40 टक्के, केदार जायवार – 87.50 टक्के, स्नेहल साळवे – 83.80 टक्के, दीपाली साखरे – 82.60 टक्के, रूपाली साखरे – 82.20 टक्के, ऋतुजा गिरी – 82.00 टक्के, लक्ष्मण मनुरे – 77.00 टक्के, पूजा वाघ – 67.00 टक्के इयत्ता 12 वीतील गुणवंत विद्यार्थी (विज्ञान, कला व वाणिज्य शाखा) राजारपल्ले माधव – 85.83 टक्के, कदम माधवराव – 84.50 टक्के, तोडकर प्रशांत – 83.33 टक्के, इंगळे रिंकोश – 83.17 टक्के, या प्रसंगी सोनटक्के, पवार, चाभरकर, जपलवाड, भुजबळ, फड, स्वामी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS