Homeमहाराष्ट्र

अग्निपंख फाउंडेशनकडून शालेय साहित्याचे वाटप; ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील उपक्रम

श्रीगोंदा: अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरजू व उपेक्षित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कामधेनू असणाऱ्या नागवडे कारखान्याचे जतन करा; चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे आवाहन
मुंढेकरवाडीचा यश कुरुमकर देशसेवेत; भारतीय सैन्य दलाचे कठीण प्रशिक्षण पूर्ण करून राजस्थानमध्ये होणार रुजू
जलसंधारणचा गैरकारभार आणि महावितरणच्या त्रुटींविरोधात श्रीगोंद्यात उपोषण; शेतकरी संतप्त

श्रीगोंदा: अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरजू व उपेक्षित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ढवळगाव येथे बुधवारी आयोजित विशेष कार्यक्रमात उद्योजक गणेश साळुंके, विकास आढाव आणि अनिरुद्ध लाकुडझोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या साहित्याचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात नुकतीच पोलीस कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झालेल्या अंकुश कऱ्हे आणि प्रतिक्षा रोटकर यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना विकास आढाव म्हणाले की, आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार आणि संस्कारांनुसार काम केल्यास जीवनात यश निश्चित मिळते. माझे वडील निरक्षर असले तरी त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी लाखमोलाचे ठरले. समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या अग्निपंख फाउंडेशनच्या शैक्षणिक कार्याला यापुढेही माझे सहकार्य राहील. गणेश साळुंके यांनीही आपल्या मनोगतात समाजसेवेची प्रेरणा वडिलांकडून मिळाल्याचे सांगत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास मदत होत असल्याचे नमूद केले.

अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन आढाव यांनी शाळा आणि विद्यालये ही समाज परिवर्तनाची खरी माध्यमे असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्राला मदत करणे हेच फाउंडेशनचे प्रमुख ध्येय असून आगामी काळात शिक्षकांसाठी मोटिव्हेशन कॅम्प तसेच विद्यार्थी व खेळाडूंसाठी विशेष महोत्सव आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. संजय लाकुडझोडे, बाळासाहेब पवार यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मधुकर सुपेकर यांनी केले. या कार्यक्रमास सचिन कातोरे, रमेश साळुंके, किसन वऱ्हाडे, जयश्री डोंगरे, बाळासाहेब शिंदे, तुकाराम बोरगे, गौतम वाळुंज, माणिक ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केले तर सुनील डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS