Homeताज्या बातम्या

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरमनिमित्त ताजियाची स्थापना; आज विसर्जन तर रविवारी महाप्रसादाचे आयोजन

श्रीगोंदा: शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम पर्वानिमित्त पारंपरिक पद्धतीने ताजिया (ताबुत) स्थापना कर

दहावी उत्तीर्ण दानिश अनीस सय्यद याचे हार्दिक अभिनंदन; बीडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्या शुभेच्छा
शाळांना निधी नाही, पण पोलीस अधीक्षक निवासस्थान दुरुस्तीसाठी ९३ लाखांचा खर्च; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
अहिल्यानगर शहरातील रस्त्यावर उघडे ड्रेनेज; प्रवास बनला धोकादायक, तातडीने दुरुस्तीची मागणी
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक शेख महंमद महाराज

श्रीगोंदा: शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम पर्वानिमित्त पारंपरिक पद्धतीने ताजिया (ताबुत) स्थापना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जपली असून यावर्षीही दि. १७ जून २०२६ रोजी धार्मिक विधी आणि परंपरेनुसार ताजियाची स्थापना करण्यात आली. मोहरमच्या दिवसांमध्ये येथे मोठ्या श्रद्धेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोहरम पर्वात ताजिया स्थापनेला विशेष महत्त्व असून श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील विविध भागांत ताजिया, सवारी आणि पंजाची स्थापना करण्यात आली आहे. शहरात जावेद फकीर, राजू मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार यांच्यासह अनेक ठिकाणी ताजिया स्थापन करण्यात आले असून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत आहेत.

यंदाच्या मोहरम उत्सवानिमित्त आज शुक्रवार दि. २६ जून रोजी ताजिया विसर्जनाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच रविवारी (दि. २८) ‘तिजायत’ निमित्त शेख महंमद बाबा दरबारात खिचड्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष तथा शेख महंमद बाबा यांचे वंशज नगरसेवक आमीनभाई शेख यांनी केले आहे.

दौलतराव शिंदे घराण्याकडून ऐतिहासिक निधी

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरमनिमित्त ताजिया स्थापनेची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवासाठी पूर्वीपासून दौलतराव शिंदे घराण्याकडून आर्थिक मदत दिली जात असल्याची नोंद उपलब्ध असून त्यासंदर्भातील सनदही दर्गाहकडे जतन करण्यात आली आहे. या ऐतिहासिक परंपरेमुळे येथील मोहरम उत्सवाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS