Homeताज्या बातम्या

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा श्रीगोंद्यात ‘राजमाता’ पतसंस्थेकडून गौरव; शिवानी जठार आणि अदिती शिंदे यांचा सन्मान

श्रीगोंदा : वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एमबीबीएस (MBBS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल श्रीगोंदा शहरातील होतकरू विद्यार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त मढीत आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते महाआरती
रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ; कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन
अगस्ती आश्रमामुळे अकोलेच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व; गोविंदगिरी महाराजांच्या उपस्थितीत अकोलेत महिनाभर अखंड कीर्तन महोत्सव

श्रीगोंदा : वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एमबीबीएस (MBBS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल श्रीगोंदा शहरातील होतकरू विद्यार्थिनींचा ‘राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या’ वतीने नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या कठीण अभ्यासक्रमात यश मिळवून आपल्या कुटुंबासह श्रीगोंदा तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शिवानी रमेश जठार (बीजे मेडिकल कॉलेज, पुणे) आणि अदिती दीपक शिंदे (एसएमबीटी कॉलेज, नाशिक) या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यासाठी राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेने पुढाकार घेतला. संस्थेच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दोन्ही नवनियुक्त डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवानी ही ॲड. रमेश सदाशिव जठार यांची तर अदिती ही पूर्वा केम टेकचे डिव्हिजनल मॅनेजर दीपक रामदास शिंदे यांची कन्या आहे.

या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे चेअरमन जालिंदर निंभोरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोर, संचालक माधव बनसोडे, ॲड. रमेश जठार यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ग्रामीण भागातील मुलींनी मोठ्या जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी समाजसेवेची भावना जपत आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या सेवेसाठी करावा,” अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

COMMENTS