Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री साईबाबांच्या चरणी नऊ दिवसांत 18 कोटींची देगणी

शिर्डी प्रतिनिधी : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित

शहरटाकळीत मतदान जागृती अभियान उत्साहात
छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा
अहमदनगर शहरात डी-मार्ट मॉलचे उद्घाटन

शिर्डी प्रतिनिधी : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 25 डिसेंबर 2022 ते दिनांक 02 जानेवारी 2023 याकालावधीत सुमारे 08 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे 17.81 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त दिनांक 25 डिसेंबर 2022 ते दिनांक 02 जानेवारी 2023 याकाळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून 8 कोटी 78 लाख 79 हजार रुपये, देणगी काउंटरव्दारे 03 कोटी 67 लाख 67 हजार रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्दारे 02 कोटी 15 लाख 18 हजार रुपये, ऑनलाईन देणगीव्दारे 01 कोटी 21 लाख 02 हजार रुपये, चेक-डिडीव्दारे 98 लाख 79 हजार 973 रुपये व मनी ऑडरव्दारे 03 लाख 21 हजार 653 रुपये अशी एकुण 16 कोटी 84 लाख 69 हजार 396 रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने 01 किलो 849 ग्रॅम (90 लाख 31 हजार 167 रुपये) व चांदी 12 किलो 696 ग्रॅम 06 लाख 11 हजार 478 रुपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातुन एकुण 17 कोटी 81 लाख 12 हजार 041 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
                    या शिवाय याकाळात शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत सुमारे 08 लाख साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला असून यामध्ये जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे 01 लाख 91 हजार 135 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असून याव्दारे 04 कोटी 05 लाख 12 हजार 542 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात 05,70,280 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 01,11,255 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच 08,54,220 लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे 01 कोटी 32 लाख 19 हजार 200 रुपये प्राप्त झालेले आहे.तसेच याकालावधीत साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे 01,28,052 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 16207 साईभक्तांची अशी एकुण 1,44,259 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच दिनांक 31 डिसेंबर 2022 व 01 जानेवारी 2023 या याकालावधीत 171 रक्तदाते साईभक्तांनी रक्तदान केलेले आहे.श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालया मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे ही जाधव यांनी सांगितले.

COMMENTS