Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी कृषी बाजार समिती होणार डिजिटल ः अरूण तनपुरे

वांबोरीत शेतमालाचे डिजिटन पद्धतीने वजनमाप सॉफ्टवेअरचा शुभारंभ

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीतील बहुतांश व्यवहार हे आता ऑनलाई

सकारात्मक दृष्टिकोनाने यशाची उंची गाठता येते – न्यायाधीश रेवती बागडे 
पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करावी

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीतील बहुतांश व्यवहार हे आता ऑनलाईन होणार आहेत. अश्या प्रकारची आद्ययावत यंत्रणेचा वापर करणारी राहुरीची कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील पहिली बाजार समिती ठरली असल्याचे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे ह्यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजार येथे शेतमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप सॉफ्ट वेअर बंतोष प्रणालीचा शुभारंभ व सोलर ऑनग्रीड सिस्टीम व सुलभ शौचालय या कामाचा शुभारंभ प्रसंगी सभापती अरुण तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती भानुदास नवले वकील होते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच बापुशेठ मुथा, पंचायत समितीचे माजी उपसभापती एकनाथ ढवळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे कात्रडचे उपसरपंच संदिप निकम, माजी सभापती अशोक साळुंके, माजी सरपंच नितीन बाफना आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना तनपुरे म्हणाले की, बंतोष अ‍ॅप मुळे शेतकर्‍यांना त्यांचे मालाचे वजन भाव हे आता घरबसल्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. बहुतांश व्यवहार हे ह्या अँपद्वारे समजणार आहे. वांबोरी उपबाजार येथे 1000 टनी गोडावून बांधले, चाळणीची व्यवस्था केली ही सुविधा राहुरीत नाही. कोल्ड स्टोअर्रेज सुरु करण्याचा वांबोरीला होता, पण मुळा प्रवरा 18 तासापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नसल्याने तो रद्द केला.येथे चांगल्या प्रकारचे कँटीन सुरु करणार आहे. त्यास सवलतीच्या दराने भोजन देणार आहे. विजेच्या पोलची उंची वाढवून देणार आहे निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासानाची पूर्तता लवकरच करू. व्यापारी आडते ह्यांनी शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव द्यावा. शेतकरी माल घेऊन आला तरच बाजार समिती चालेल. असे सांगून बाजार समितीचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी वृक्षा रोपण करण्यात येईल. बाजार समितीचा परिसर स्वच्छ करण्याचा मानस आहे. सुविधाचा लाभ घ्यावा डिजिटल प्रणालीचा वापर करावा. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भानुदास नवले वकील, संचालक सुरेश बाफना मच्छिन्द्र सोनवणे ह्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संचालक मधुकर पवार रामदास बाचकर, भाऊसाहेब खेवरे सुभाष डुक्रे, महेश पानसरे आबासाहेब वाघमारे भागवत पागिरे,प्रभाकर पानसंबळ,भाऊसाहेब चौधरी ,रखमाजी जाधव राजूशेठ भराडिया,सुनील बोथरा किसनराव पागिरे नामदेवराव म्हसे कारभारी गांधले,निलेश पारख अक्षय मुथा सत्यनारायण बिहाणी आनंद सोलरचे अवधूत कुलकर्णी,राहुरीचे सचिव भिकादास जरे, वांबोरी उपबाजारचे सचिव संदिप पावले आदि सह अधिकारी कर्मचारी शेतकरी व्यापारी हमाल मापडी आडते उपस्थित होते.संचालक बाळासाहेब खुळे ह्यांनी आभार मानले.

COMMENTS