Homeताज्या बातम्या

गेवराई पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, 12 जण ताब्यात, 6.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारव

Dindori : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तोडण्याची नामुष्की (Video)
गोर्टा स्मारक निजामाच्या राजवटीतून केलेल्या मुक्ततेंचे प्रतीक
संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय



अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 63 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या निर्देशानुसार गेवराई पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गेवराई-ताकडगाव रोडवरील शिवनेरी मंगल कार्यालयाजवळील गायरान जमिनीवर काही इसम पत्त्यांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी 24 जून 2026 रोजी सायंकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेढा घालून 12 जणांना रंगेहात पकडले. घटनास्थळी सुरू असलेल्या जुगार खेळाची नोंद घेत पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त केले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते, मोबाईल फोन, मोटारसायकली तसेच इतर साहित्य असा एकूण 6 लाख 63 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध जुगार, मटका, दारू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून अशा कारवाया पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही यशस्वी कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड, पोलीस उपनिरीक्षक रामराव खोत, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारधी तसेच गणेश घोलप, आरेफ बागवान, ऋषिकेश पोटे, विकास डरपे, नितीन नवले आणि गोरक्ष डोके यांच्या पथकाने या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

COMMENTS