Homeताज्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारांसह विकासकामांवर चर्चापंतप्रधान मोदींची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दिल्लीत भेट

मुंबई :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. संसदेचे पावसाळी अध

  “धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?


मुंबई :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना झालेल्या या भेटीत राज्यातील विकासकामे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, पूरग्रस्त भागांतील मदतकार्य, तसेच विविध प्रलंबित योजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यासोबतच केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर देखील महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. यावेळी शिवसेनेच्या लोकसभा सदस्यांनीही पंतप्रधानांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघांतील विविध प्रश्‍न मांडले.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ते दिल्लीत आले होते. त्याचवेळी पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिल्याने महाराष्ट्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्याची संधी मिळाली. राज्यातील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागातील उपाययोजना, पायाभूत सुविधा, प्रलंबित विकास प्रकल्प आणि केंद्र-राज्य समन्वयातून विकासाला अधिक गती देण्याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या लोकसभा सदस्यांशी पंतप्रधानांनी स्वतंत्र संवाद साधला. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, निधीची आवश्यकता आणि जनतेशी संबंधित प्रश्‍न यांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय वाढविण्यावरही भर देण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्व लोकसभा सदस्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. देशातील तरुणांच्या प्रश्‍नांबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर शिंदे यांनी सांगितले की, देशाच्या विकासात युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण, कौशल्य विकास, उद्योगनिर्मिती, उद्योजकता आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, विकसित भारताच्या ध्येयपूर्तीत तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संसदेच्या कामकाजाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. जनतेशी संबंधित प्रश्‍नांवर सभागृहात चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी आंदोलन आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यावर अधिक भर दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले. लोकशाही व्यवस्थेत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविणे अधिक योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार युवकांच्या हितासाठी विविध योजना राबवत असून त्याचा लाभ देशातील मोठ्या युवकवर्गाला होत असल्याचा दावा त्यांनी केला. विकासाच्या मुद्यांवर विधायक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर भेटीला विशेष महत्व
या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना आणि पक्षचिन्हासंदर्भातील प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, केंद्र-राज्य समन्वय आणि आगामी राजकीय घडामोडी यासंदर्भातही विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या विषयांवर अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

COMMENTS