माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरु असलेले उपक्रम शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहेत. गेवराई

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरु असलेले उपक्रम शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहेत. गेवराई शहरात एकाचवेळी शेतकरी भवन आणि बचतगट भवन या दोन्ही बांधकामाचे भुमिपूजन होत असून यामुळे भविष्यात शेतकरी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. स्व. अजितदादा पवार साहेब यांनी दोन्ही कामांसाठी मंजुरी मिळवून दिली, त्यांच्या संकल्पनेतील विकास कामे उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिणी पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. शेतकरी भवन आणि बचतगट भवनाच्या बांधकामाचे भुमिपूजन करताना ते बोलत होते, यावेळी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून 1 कोटी 86 लक्ष रुपये किंमतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचे बचतगट भवन बांधकामाचा भुमिपूजन समारंभ गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दि.7 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, पांडुरंग कोळेकर, जय भवानीचे संचालक जगन्नाथ शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जयदीप औटी, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, नगर परिषदेतील गटनेते शेख खाजाभाई यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या नुतण कार्यकारीणीचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रविंद्र बोराडे, सदस्य परमेश्वर खरात, गजानन काळे, अजीम इनामदार, सतिष गाडे आणि दादासाहेब रोकडे यांचा आ. विजयसिंह पंडित यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरता यावी यासाठी प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा, मेळावे आदींचे निवासी आयोजन करण्याची सुविधा या बचतगट भवनमध्ये करण्यात आली आहे. शेतीमाल प्रक्रिया आणि कृषी व्यवसाय वाढविण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध होणार आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करताना दिसत आहेत, रेशीम शेतीसारखी नफ्याची शेती करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून या प्रगतीशिल शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. बाजार समितीने अलिकडेच सुमारे 11 कोटी 42 लक्ष रुपयांची कामे केली आहेत. बाजार समितीकडून सुरु केलेल्या कांदा मार्केटला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लवकरच वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोअरेजची कामे सुरु होणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात सांगितले. महिला बचतगटांना स्वतःचे कायमस्वरुपी कार्यालय आणि उत्पादीत केलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बचतगट भवनाचा भविष्यात उपयोग होईल. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचतगटाची चळवळ प्रभावीपणे राबविण्याचे काम आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात महिला उद्योजकता व सामुहिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून करणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले. त्यांच्याहस्ते पंचायत समिती परिसरात सुमारे 1 कोटी रुपये किंमतीच्या बचतगट भवन बांधकामाचा भुमिपूजन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीराम आरगडे, सतिष दाभाडे, मुजीब पठाण, बाबासाहेब जाधव, कृष्णा राऊत, रामराव चाळक, अशोक नाईकवाडे, हनुमान कोकणे, रमेश साखरे, रामलाल धस, बाबुराव जाधव, ड.शरद चव्हाण, जगनपाटील काळे, बळीराम खरात, सतिष पवार, सुभाषराव मस्के, कृष्णा गळगुंडे, उत्तमराव सोलाने, मदन लगड, महेश शिंदे, शांतीलाल पिसाळ, नारायणराव नवले, रावसाहेब देशमुख, महेश सौंदरमल, दिनेश घोडके, आनंद सरपते, जे.के.बाबुभाई, दादासाहेब घोडके, अशोक बोरकर, राहुल खरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS