Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!

https://www.youtube.com/watch?v=i4kudTX_4TY गरिबांच्या श्रमावर डल्ला आणि विश्वासाला तडा! कर्जत तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. ज

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत; धोत्रे ग्रामपंचायत प्रथम; १५ लाखांचे बक्षीस  
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलांना शिक्षण मोफत; साई संस्थानचा निर्णय; विविध परीक्षांचे शुल्क देखील भरणार; निवासही निशुल्क 
सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड

गरिबांच्या श्रमावर डल्ला आणि विश्वासाला तडा! कर्जत तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. जिथे शिलाई मशिनच्या नावाखाली शेकडो गरीब महिलांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.
७५०० रुपयांत दोन शिलाई मशिन देतो, असं आमिष दाखवण्यात आलं. फक्त ११०० रुपये बुकिंगसाठी भरले की मशिन मिळेल, असं सांगून प्रशांत अडसूळ नावाच्या व्यक्तीने तालुक्यातील ४३९ महिलांकडून तब्बल ४ लाख ८२ हजार ९०० रुपये उकळले.
पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुतार यांनी या योजनेवर विश्वास ठेवला आणि महिलांकडून पैसे गोळा करून आरोपीकडे दिले. पण महिने उलटले तरी मशिन मिळालं नाही आणि आता आरोपी फोनही उचलत नाहीये. अखेर या फसवणुकीविरोधात कर्जत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अत्यंत कष्टाने साठवलेले पैसे आणि उसने-पासने करून भरलेली रक्कम बुडाल्याने महिलांमध्ये मोठा संताप आहे. “गरीब महिलांच्या तोंडचा घास पळवणाऱ्याला अटक करा”, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बचत गटांनी दिला आहे. आता पोलीस या भामट्याला कधी गजाआड करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

COMMENTS