पुणे : पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे

पुणे : पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला असून, लोहगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय 48) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबुरे हा हवाई दलाच्या जवानासारखा गणवेश परिधान करून फिरत असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकार्यांना मिळाली होती.

COMMENTS