Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा

बीड :बीड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागातून जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या रस

दिव्यांगांची थकीत पेन्शन तत्काळ द्या; चाँद शेख; शेवगाव तहसीलसमोर सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध; शिर्डीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली नागरिकांची भेट
मंत्रालयातील लाचखोरी!

बीड :
बीड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागातून जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सदर कामाला गती देऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून सध्या येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत ठेवण्यात आला असून खड्डे तसेच अपूर्ण कामामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात असल्याची तक्रार प्रशासनासमोर मांडण्यात आली. कामाची गती वाढवण्यासाठी तात्काळ अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, तसेच कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने शिफ्ट पद्धत राबवून काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. कामात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येणार्‍या पावसाळ्यात या रस्त्यामुळे नागरिकांची अडचण अधिक वाढू नये म्हणून सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. रस्त्याचे पृष्ठभागीकरण, डांबरीकरण तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या कामाच्या प्रगतीचा पुन्हा सविस्तर आढावा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्या बैठकीत कामाची सद्यस्थिती, प्रगती आणि अडथळे यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. या निर्देशांनंतर संबंधित यंत्रणांनी कामाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

COMMENTS