Homeताज्या बातम्या

नांदेड शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम; 64 प्रकरणांवर कारवाई, 54 हजार दंड

नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर वाहन उभे केल्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने

पाटबंधारे विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारातच चहाचे दुकान; प्रशासनाच्या भूमिकेवर संशयअतिक्रमण हटविल्यानंतर शासकीय आवारात व्यवसाय सुरू; कार्यकारी अभियंता एस. एन. पवार यानी शासकीय जागा किरायाने दिली काय?
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ



नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर वाहन उभे केल्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 6 जुलै 2026 रोजी करण्यात आली.
रेल्वे स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वजीराबाद चौक, तिरंगा चौक आणि गोवर्धन घाट पुल परिसरातील प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी, राखीव पोलीस पथक तसेच महानगरपालिकेचे पथक सहभागी झाले. रस्त्यावरील हातगाड्या, फळविक्रेते, टपर्‍या आणि इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणार्‍या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. एकूण 64 प्रकरणांवर कारवाई करून 54  हजारांचा दंड वसूल करण्यात आला.  पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे अतिक्रमण किंवा वाहन उभे करू नये. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS