Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार संगणकीय ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज : डॉ. हारुणभाई इनामदार

केज शहरात 'जय गजानन कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर'चे मोठ्या उत्साहात उद्घाटन केज : बदलत्या काळानुसार आणि आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रा

अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार; कोपरगाव येथील ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ग्वाही
जलंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा उत्साहात संपन्न; आंबेडकरी अनुयायांची मोठी उपस्थिती
शेवगावात सैनिक परिवार स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक माजी सैनिक व कुटुंबीयांची उपस्थिती

केज शहरात ‘जय गजानन कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन

केज : बदलत्या काळानुसार आणि आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात संगणकीय ज्ञान अवगत असणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी केले. केज शहरातील अहिल्यादेवी नगर भागातील उमरी रोड, तोंडसे कॉम्प्लेक्स येथे ‘जय गजानन कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या डिजिटल प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केजच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. सीताताई बनसोड, डॉ. हारुणभाई इनामदार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अत्यंत उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बाळासाहेब गाढवे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, पत्रकार तात्या गवळी, अभिमान (बापू) बचुटे, विनोद गुंड, आणि इंटेल कम्प्युटर सेंटरचे प्रमुख गणेश सत्वधर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक भीमाशंकर तोंडसे सर व त्यांच्या परिवाराकडून मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नगराध्यक्षा डॉ. सौ. सीताताई बनसोड यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, केज शहराची वाढती व्याप्ती पाहता, या परिसरातील मुली आणि महिलांसाठी हे कम्प्युटर सेंटर अत्यंत सोयीचे आणि फायदेशीर ठरेल. महिलांनी येथे संगणक प्रशिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत आपले नाव उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्राचे संचालक भीमाशंकर तोंडसे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, या ट्रेनिंग सेंटरमध्ये संगणक क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिलांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पी. पी. जाधव सर, गणेश तोंडसे, मंगेश सातपुते यांच्यासह जीवन शिक्षण विद्यालयाचे शिक्षक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

COMMENTS