नांदेड : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड वि

नांदेड : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत हजूर साहिब नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 07701 हजूर साहिब नांदेड-आसनसोल विशेष ही गाडी दि. 21 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी हजूर साहिब नांदेड येथून रात्री 23:50 वाजता सुटणार असून गुरुवारी दुपारी 12:00 वाजता आसनसोल येथे पोहोचणार आहे. ही गाडी मार्गातील पूर्णा (02:20 वाजता), हिंगोली (03:52 वाजता), वाशिम (04:52 वाजता), अकोला (06:50 वाजता), बडनेरा (08:32 वाजता), नागपूर (12:10 वाजता), गोंदिया (14:15 वाजता), दुर्ग (16:35 वाजता), रायपूर (17:30 वाजता), बिलासपूर (19:45 वाजता), झारसुगुडा (23:35 वाजता), राऊरकेला (01:55 वाजता), टाटानगर (07:20 वाजता), चांदिल (08:32 वाजता) आणि पुरुलिया (09:42 वाजता) येथे थांबेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07702 आसनसोल-हजूर साहिब नांदेड विशेष ही गाडी दि. 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी आसनसोल येथून दुपारी 14:00 वाजता सुटेल व शनिवारी 00:45 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. परतीच्या मार्गावर ही गाडी आसनसोल (14:00 वाजता) येथून सुटून पुरुलिया (16:02 वाजता), चांदिल (17:02 वाजता), टाटानगर (18:30 वाजता), राऊरकेला (22:35 वाजता), झारसुगुडा (00:35 वाजता), बिलासपूर (04:15 वाजता), रायपूर (06:02 वाजता), दुर्ग (06:55 वाजता), गोंदिया (09:15 वाजता), नागपूर (11:35 वाजता), बडनेरा (15:05 वाजता), अकोला (18:30 वाजता), वाशिम (19:52 वाजता), हिंगोली (20:52 वाजता) आणि पूर्णा (22:50 वाजता) येथे थांबून हजूर साहिब नांदेड (00:45 वाजता) येथे पोहोचेल. या विशेष गाडीत एकूण 24 डबे असतील. त्यामध्ये 02 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 06 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान श्रेणी, 04 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 02 सामान व रक्षक डबे असतील. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घ्यावा व प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करून नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

COMMENTS