Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्‍यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर

नांदेड : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. आनंदरा

नांदेड दक्षिण मतदारसंघात 20 कोटी 70 लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण
 सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता गलधर यांचा गलथान कारभार पुन्हा उघड; गुरुद्वारा मार्गाचे काम 100 दिवसांपासून ठप्प
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
आनंदराव पाटील बोंढारकर added a... - आनंदराव पाटील बोंढारकर

नांदेड : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. आनंदराव बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि ठाम पाठपुराव्यामुळे अखेर राज्य शासनाने 24 कोटी 50 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर केला असून याचा थेट लाभ 29 हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार बोंढारकर यांनी शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी विधानसभेत वारंवार आवाज उठवला. त्यांनी शासनाकडे ठोस भूमिका मांडत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ पिक विम्याचा लाभ देण्याची मागणी सातत्याने लावून धरली. नांदेड शहर व ग्रामीण मतदारसंघातील सुमारे 31 हजार शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर या शेतकर्‍यांना विमा मिळणे अत्यावश्यक होते. यासाठी आमदार बोंढारकर यांनी प्रशासन, कृषी विभाग आणि राज्य शासन यांच्याशी सतत पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून 29 हजार पात्र शेतकर्‍यांना विमा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीची रक्कम लवकरच संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती आमदार बोंढारकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून आगामी हंगामासाठी त्यांना नव्याने उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी पुत्र म्हणून ओळख असलेल्या आमदार बोंढारकर यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी दिलेल्या या लढ्याला यश मिळाल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकर्‍यांमध्ये विश्वास वाढला असून भविष्यातही अशाच प्रकारे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी ते ठामपणे उभे राहतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS