Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोठडीतल्या महिलेकडे केली तिच्या मुलीची मागणी; पोलिस अधिकार्‍याचे निलंबन, संतापाची लाट

अकोला : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतील एका अधिकार्‍यानेच आपल्या पदाचा गैरवापर करत कोठडीत असलेल्या महिलेकडे अश्‍लाघ्य

राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता
‘शरीर सुखासाठी मुलगी पाठव, 10 हजार देतो’ ; पोलिस अधिकाऱ्याची कोठडीतील महिलेकडे मागणी
प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

अकोला : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतील एका अधिकार्‍यानेच आपल्या पदाचा गैरवापर करत कोठडीत असलेल्या महिलेकडे अश्‍लाघ्य मागणी केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, संबंधित अधिकार्‍यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश जाधव नावाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी कोठडीत असलेल्या एका महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केली. या बदल्यात दहा हजार रुपयांचे आमिषही दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित महिला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत होती आणि तिला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. याच काळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. या घटनेने संतप्त झालेल्या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार केली. तक्रार मिळताच वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करत प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आरोपी अधिकार्‍याची चौकशी करण्यात आली असता, त्याला सर्वांसमोर खडसावण्यात आले. वर्दीचा मान राखला नाही, अशी तीव्र शब्दांत त्याची कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते. या घटनेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, त्यात वरिष्ठ अधिकारी आरोपीला जाब विचारताना दिसतात. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणात विलंब न करता कारवाई करत राजेश जाधव यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

COMMENTS