Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

पाथर्डी प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा बाबुजी आव्हाड महाविद्यालय आणि एम एम निऱ्याळी विद्यालयाच्या म

हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात
पढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
आमदारांनी नव्हे तर मनपाने केला नूतनीकरणावर दीड लाखाचा ख़र्च

पाथर्डी प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनी पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा बाबुजी आव्हाड महाविद्यालय आणि एम एम निऱ्याळी विद्यालयाच्या मैदानावर प्रांताधिकारी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.या स्पर्धेसाठी प्रताप ढाकणे आणि अभय आव्हाड हे उपस्थित होते.

    या स्पर्धेत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.यामध्ये सांघिक खेळात कबड्डी,खो-खो,व्हॉलीबॉल,फुटबॉल,हे खेळ घेण्यात आले.तसेच वैयक्तिक खेळात गोळा फेक,भालाफेक,लांबउडी,उंचउडी,थाळीफेक,बॅडमिंटन,कॅरम, बुद्धिबळ घेण्यात आले.

   या सर्व स्पर्धेत प्रांतधिकारी क्षीरसागर, तहसीलदार शाम वाडकर,नायब तहसीलदार गुंजाळ,ससाने,तसेच कर्मचारी रवी सानप,राहुल गुरव,हरी सानप,वैभव कराड,अनिल धोत्रे, प्रदीप मगर,गणेश वावरे या खेळाडू बरोबरच महिला खेळाडू सोनाली दहिफळे, वैशाली दळवी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पाथर्डी तालुका क्रीडा प्रमुख पप्पू शिरसाठ याच्या मार्गदर्शनाखाली अजय शिरसाट, सचिन शिरसाट,सुरेश दहिफळे, अविनाश घुगे या सर्व क्रीडा शिक्षकांनी पार पाडल्या.

COMMENTS