Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. एआय आधारीत सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरविणारी ही कंपनी नोएडा येथील आहे.  तिचे कार्यक्षेत्र युएसए, कॅनडा, सिंगापूर अशा विवीध ठिकाणी विस्तारलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम सत्राची परीक्षा अद्याप द्यायची आहे. त्यापूर्वीच त्यांच्या  हाती नोकरीची आर्डर मिळाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट  कामगिरीने संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत कायम आघाडीवर असल्याचे वास्तव समोर येत आहे.  या विद्यार्थ्यांत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अश्विनी नितिन मुंगसे, धनश्री जगदीश शहाणे, समृध्दी महेंद्र बोरावके, इन्फर्मेशन टेक्नांलॉजीच्या अथर्व संजय भवर, शताक्षी सतिष भुसारी, हर्षल उमेश पाटील, प्रज्वल राजस सरोदे, श्रेयश चंद्रशेखर तळेकर व जयेश संजय थेटे यांचा समावेश आहे. संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग औद्योगिक जगतासोबत समन्वय ठेवतो. त्यानुसार विद्यार्थ्यांना अतिरीक्त प्रशिक्षण दिले जाते.  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन व त्यांची टीम यांचे अभिनंदन केले आहे.  “माझ्या भावाचे करिअर संजीवनीत घडले. त्यामुळे मी निशंकपणे येथे प्रवेश घेतला. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. परीक्षेपूर्वीच चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. ‘स्मार्ट पाथहोल डिटेक्शन सिस्टिम युजिंग एआय-एमएल’ हा प्रकल्प करण्याची संधी मिळाल्याने एआय क्षेत्रातील कंपनीत संधी मिळणे सोपे झाले. प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने आमच्यावर घेतलेल्या मेहनतीमुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला,” — धनश्री शहाणे, विद्यार्थिनी.

संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
संजीवनी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना नोकरी
‘संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक अखंड परिवार; आमदार विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन
संजीवनीच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. एआय आधारीत सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरविणारी ही कंपनी नोएडा येथील आहे.  तिचे कार्यक्षेत्र युएसए, कॅनडा, सिंगापूर अशा विवीध ठिकाणी विस्तारलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम सत्राची परीक्षा अद्याप द्यायची आहे. त्यापूर्वीच त्यांच्या  हाती नोकरीची आर्डर मिळाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट  कामगिरीने संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत कायम आघाडीवर असल्याचे वास्तव समोर येत आहे. 

या विद्यार्थ्यांत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अश्विनी नितिन मुंगसे, धनश्री जगदीश शहाणे, समृध्दी महेंद्र बोरावके, इन्फर्मेशन टेक्नांलॉजीच्या अथर्व संजय भवर, शताक्षी सतिष भुसारी, हर्षल उमेश पाटील, प्रज्वल राजस सरोदे, श्रेयश चंद्रशेखर तळेकर व जयेश संजय थेटे यांचा समावेश आहे. संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग औद्योगिक जगतासोबत समन्वय ठेवतो. त्यानुसार विद्यार्थ्यांना अतिरीक्त प्रशिक्षण दिले जाते.

 ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन व त्यांची टीम यांचे अभिनंदन केले आहे. 

“माझ्या भावाचे करिअर संजीवनीत घडले. त्यामुळे मी निशंकपणे येथे प्रवेश घेतला. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. परीक्षेपूर्वीच चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. ‘स्मार्ट पाथहोल डिटेक्शन सिस्टिम युजिंग एआय-एमएल’ हा प्रकल्प करण्याची संधी मिळाल्याने एआय क्षेत्रातील कंपनीत संधी मिळणे सोपे झाले. प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने आमच्यावर घेतलेल्या मेहनतीमुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला,” — धनश्री शहाणे, विद्यार्थिनी.

COMMENTS