Homeताज्या बातम्या

अमेरिकेच्या दबावाखाली भारताची परराष्ट्र नीती; शिक्षण, शेती आणि करव्यवस्थेवर खा. राहुल गांधींची सडकून टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र, शिक्षण आणि कृषी धोरणांवर तीव्र ट

अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
अमेरिकेबरोबरील करार का स्वीकारला? राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका -  Marathi News | Rahul Gandhi Criticizes Pm Modi Over India Us Trade Deal  Surrender Allegation Rub 99 - Latest Desh ...

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र, शिक्षण आणि कृषी धोरणांवर तीव्र टीका करत भारताची परराष्ट्र नीती अमेरिकेच्या दबावाखाली कार्यरत असल्याचा आरोप केला. सिमकनी येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला प्रतिकूल हवामानामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी नवी दिल्लीहून दूरध्वनीद्वारे (फोनवरून) कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी केंद्रातील सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताच्या परराष्ट्र निर्णयांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी देशाच्या स्वायत्त निर्णयक्षमतेबाबत चिंता व्यक्त केली. कोणत्या देशाकडून इंधन खरेदी करायचे आणि कोणत्या देशाशी व्यापार संबंध ठेवायचे, याबाबत बाह्य दबाव वाढत असल्याचे ते म्हणाले. परराष्ट्र विषयाबरोबरच त्यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील स्थितीवरही भाष्य केले. केंद्र सरकारची धोरणे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुरेशी परिणामकारक नसल्याचा दावा त्यांनी केला. सध्याच्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला असून कृषी क्षेत्र अनेक अडचणींना सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

करव्यवस्थेचाही उल्लेख करत राहुल गांधी यांनी वस्तू व सेवा कराच्या (GST) अंमलबजावणीवर टीका केली. या व्यवस्थेच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींमुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक लहान उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले असून रोजगार निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील संधी काही मोजक्या मोठ्या उद्योगसमूहांपुरत्याच मर्यादित होत असल्याची टीकाही त्यांनी केली. सभेच्या शेवटी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना निराश न होण्याचे आवाहन केले. हवामानातील अडचणीमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी लवकरच पुन्हा भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, काँग्रेसच्या राज्य प्रभारी कुमारी शैलजा यांनी खराब हवामानामुळे राहुल गांधी यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी दूरध्वनीद्वारे सभेला संबोधित केल्याचेही स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, आमदार सुमित हृदयेष, यशपाल आर्य, प्रीतम सिंग, भुवन कापडी, हरीश धामी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS