अकोले : तालुक्यातील कोतूळ येथील पूजा (रोहिणी) अशोक शेळके हिने सरळ सेवा भरती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शासकीय सेवेत स्थान मिळविले आहे. तिची कोल्हाप

अकोले : तालुक्यातील कोतूळ येथील पूजा (रोहिणी) अशोक शेळके हिने सरळ सेवा भरती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शासकीय सेवेत स्थान मिळविले आहे. तिची कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती झाली असून, नियुक्तीचे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते २९ मे रोजी प्रदान करण्यात आले.
अशोक शेळके आणि शांता शेळके यांची कन्या असलेल्या पूजाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची अविरत तयारी सुरू ठेवली होती. अनेक वेळा अत्यल्प गुणांमुळे अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतरही तिने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालात तिने उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय सेवेत प्रवेश मिळविला.
शेळके कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. तिचे वडील रंगकाम व्यवसायात असून आई विडी कामगार म्हणून काम करतात. या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाने मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. पूजाचा भाऊ शिवा शेळके हा देखील राज्य शासनात राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) म्हणून कार्यरत आहे. पूजाच्या या यशाबद्दल आमदार किरण लहामटे यांच्यासह कोतूळ ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS