देवळाली प्रवरा : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रॉडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक व वनीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुंदर गावचे सुपुत्र तथा माजी सैनिक ताराचंद चंद्रभान गागरे पाटील यांना ‘महाराष्ट्र साई पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी सैनिक गागरे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व ग्रामविकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सत्कारासाठी रमेश आबाजी पवार यांनी विशेष पाठपुरावा केला. या सोहळ्यास अनिलशेठ मुसमाडे पाटील, रेवजी बबन मुसमाडे पाटील, प्रा. निमसे तसेच श्रीराम सनई ताफ्यातील सदस्य उपस्थित होते. पुरस्कार जाहीर होताच परिसरातून गागरे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, सुंदर गावातील ग्रामस्थांनी माजी सैनिक ताराचंद गागरे पाटील यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

देवळाली प्रवरा : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रॉडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक व वनीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुंदर गावचे सुपुत्र तथा माजी सैनिक ताराचंद चंद्रभान गागरे पाटील यांना ‘महाराष्ट्र साई पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी सैनिक गागरे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व ग्रामविकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सत्कारासाठी रमेश आबाजी पवार यांनी विशेष पाठपुरावा केला. या सोहळ्यास अनिलशेठ मुसमाडे पाटील, रेवजी बबन मुसमाडे पाटील, प्रा. निमसे तसेच श्रीराम सनई ताफ्यातील सदस्य उपस्थित होते. पुरस्कार जाहीर होताच परिसरातून गागरे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, सुंदर गावातील ग्रामस्थांनी माजी सैनिक ताराचंद गागरे पाटील यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

COMMENTS