Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे

जामखेड : महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे महान विचारवंत होते. “प्रत्येक माणूस समान आहे” हा विचार बसवेश्वरांनी समाजात रुजवला. आज

महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जामखेड : महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे महान विचारवंत होते. “प्रत्येक माणूस समान आहे” हा विचार बसवेश्वरांनी समाजात रुजवला. आजच्या पिढीने त्यांच्या याच विचारांचे अनुकरण करून समाजात एकोपा, प्रामाणिकपणा आणि मानवतेची जपणूक करणे गरजेचे आहे तसेच समाज परिवर्तनासाठी बसवेश्वरांच्या महान विचार समाजाला गरज आहे असे प्रतिपादन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे यांनी केले.
जामखेड येथे तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती दि. १९ एप्रिल  रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बजरंग सरडे बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी दिलेला समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. समाजातील भेदभाव नष्ट करून सर्वांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बजरंग सरडे,राहुल लोहकरे, आकाश बाफना, ज्येष्ठ सेवक अरुण गुड, अमोल लोहकरे, महसूल निवडणूक अधिकारी सचिन आगे यांच्यासह शिवकुमार डोंगरे, महेश नगरे, प्रविण होळकर, संजय सरडे, जगदीश मेनकुदळे, नाना काथवटे, प्रशांत गुळवे, दिपक ढोले, विजय डोंगरे, हरिश ढोले, दत्ता चऱ्हाटे, सागर लोहकरे, अमरनाथ डोंगरे, विठ्ठल परांडकर, सुदर्शन सुरोडे, संजय टेकाळे, शिवरुद्र मेनकुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS