Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल विकास केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.  माजी  खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रेरणेने सुरू झालेली धार्मिक परंपरा आजही अखंड सुरू असून, सेवेकऱ्यांना स्वामींची सेवा करता यावी या उद्देशाने कारखाना कार्यस्थळी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या परंपरेतूनच यंदाही पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात स्वामी चारित्र पारायण सप्ताह पार पडला. या सप्ताहात १५० महिला व ३५ पुरुष अशा एकूण १८५ पारायणार्थींनी सहभाग नोंदविला. सप्ताहादरम्यान अध्यात्म व सेवेचा संगम अनुभवायला मिळाला. सात दिवस अहोरात्र सेवा देण्यात आली. माळ जप, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन तसेच अखंड वीणा वादन अशा स्वरूपात रात्रंदिवस नामस्मरण सुरू होते. या सातत्यपूर्ण सेवेमुळे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.  या सोहळ्यात कारखाना परिसरासह सुरेगाव, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, शहाजापूर, कोळगाव माळ, विघ्नवाडी व वेळापूर येथील महिला भगिनी व स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  बुधवार (दि. १५) रोजी महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. त्यानं

खरात भक्तांनी आम्हाला अध्यात्म शिकवू नये : दडीयाल
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता
श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल विकास केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

 माजी  खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रेरणेने सुरू झालेली धार्मिक परंपरा आजही अखंड सुरू असून, सेवेकऱ्यांना स्वामींची सेवा करता यावी या उद्देशाने कारखाना कार्यस्थळी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या परंपरेतूनच यंदाही पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात स्वामी चारित्र पारायण सप्ताह पार पडला. या सप्ताहात १५० महिला व ३५ पुरुष अशा एकूण १८५ पारायणार्थींनी सहभाग नोंदविला.

सप्ताहादरम्यान अध्यात्म व सेवेचा संगम अनुभवायला मिळाला. सात दिवस अहोरात्र सेवा देण्यात आली. माळ जप, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन तसेच अखंड वीणा वादन अशा स्वरूपात रात्रंदिवस नामस्मरण सुरू होते. या सातत्यपूर्ण सेवेमुळे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

 या सोहळ्यात कारखाना परिसरासह सुरेगाव, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, शहाजापूर, कोळगाव माळ, विघ्नवाडी व वेळापूर येथील महिला भगिनी व स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 बुधवार (दि. १५) रोजी महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. त्यानं

COMMENTS