शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने ; रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने ; रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

अहमदनगर प्रतिनिधी: दिवसेंदिवस नवनवीन आजार नागरिकांमध्ये येत आहे.त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याचे युगात आधुनिक तंत्रज्

पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका
शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी ; जेरबंद कर्जत पोलिसांची कामगिरी
पथदिवे सुरू करण्यासाठी नागरिकानेच घेतला पुढाकार ; जागरूक करणार मनपासाठी भिख मांगो आंदोलन

अहमदनगर प्रतिनिधी: दिवसेंदिवस नवनवीन आजार नागरिकांमध्ये येत आहे.त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याचे युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आल्यामुळे दिवसंदिवस आरोग्य सेवा ही महागडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे विविध आजार नागरिक आपल्या अंगावर काढत असते. शनेश्वर प्रतिष्ठानाचेअध्यक्ष दत्ता गाडळकर नेहमीच आरोग्य सेवेला विशेष महत्त्व दिले आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. टिळक रोडवरील शनेश्वर प्रतिष्ठानाचे आरोग्य सेवेतील कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ॲड. धनंजय जाधव यांनी केले.      शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. यावेळी ॲड. धनंजय जाधव, माजी नगरसेवक निखिल वारे, मितेश शहा, संतोष बारस्कर, मनोज खेडकर, पराग झावरे, जगदीश रामदीन, तेजस जीभकाटे, राहुल काळे, किरण रासकर, स्वप्निल मुनोत, महावीर सुराणा, अतुल डागा, सुनील सुंडके, राहुल मुथा, देविदास काळे, भरत सुपेकर, जसपित वधवा, तुषार अंबाडे, सचिन उदगीरकर, विराज मुनोत, धनेश रवत्ती, गिरीराज जाधव, तुषार चोरडिया, इंद्रभान बोरुडे, अमित धाडगे, श्रीनिवास बोडखे,रेणूल गवळी, भूपेंद्र खेडकर, अभिजीत गांगर्डे, युवराज खेडकर, आदी उपस्थित होते.       दत्ता गाडळकर म्हणाले की शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. याच बरोबर आरोग्य सेवेला महत्त्व दिले आहे. दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आज वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक दृष्टिकोनातून गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केलीअसे ते म्हणाले.

COMMENTS