Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांची थकीत पेन्शन तत्काळ द्या; चाँद शेख; शेवगाव तहसीलसमोर सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या

शेवगाव : एप्रिल महिन्यात दिव्यांग बांधवांची पेन्शन जमा न झाल्यामुळे सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका व तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीने दि. ४ मे २०२६ रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी नवनाथ औटी, गणेश महाजन, बाबासाहेब गडाख, गणेश तमाणके, अनिल विघ्ने, संदीप चेडे, खलील शेख, कांताराम तमानके, योगेश सोनवणे, महादेव काटे, शिवाजी आहेर, दत्तात्रय घोरताळे, किशोर मडके, रमेश भागवत, सुनील वाळके,गणेश तिकोणे,अंकुश दारुणकर,आझाद शेख, फतरू पठाण, कार्तिक आपशेटे,ताराचंद पिवळ, गणेश गायके,भाग्यश्री गांधी,अनिता पवार, हिरा मिसाळ, संगीता घुले यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी “सावली दिव्यांग संघटनेचा विजय असो” तसेच “दिव्यांगांची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. शासनाकडून मिळणारी पेन्शन ही दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून, पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांना निवेदन देत तात्काळ थकीत पेन्शन जमा करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान,  निलेश वाघमारे, प्रभारी तहसीलदार शेवगाव यांनी या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांना पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग सचिव पदी नियुक्ती करावी अशी मागणी सर्व दिव्यांग बांधवाकडून करण्यात आली आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
‘सोमैया’च्या 20 विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत निवड
‘प्रवरा’तील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

शेवगाव : एप्रिल महिन्यात दिव्यांग बांधवांची पेन्शन जमा न झाल्यामुळे सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका व तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीने दि. ४ मे २०२६ रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी नवनाथ औटी, गणेश महाजन, बाबासाहेब गडाख, गणेश तमाणके, अनिल विघ्ने, संदीप चेडे, खलील शेख, कांताराम तमानके, योगेश सोनवणे, महादेव काटे, शिवाजी आहेर, दत्तात्रय घोरताळे, किशोर मडके, रमेश भागवत, सुनील वाळके,गणेश तिकोणे,अंकुश दारुणकर,आझाद शेख, फतरू पठाण, कार्तिक आपशेटे,ताराचंद पिवळ, गणेश गायके,भाग्यश्री गांधी,अनिता पवार, हिरा मिसाळ, संगीता घुले यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी “सावली दिव्यांग संघटनेचा विजय असो” तसेच “दिव्यांगांची थकीत पेन्शन मिळालीच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. शासनाकडून मिळणारी पेन्शन ही दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून, पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांना निवेदन देत तात्काळ थकीत पेन्शन जमा करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान,  निलेश वाघमारे, प्रभारी तहसीलदार शेवगाव यांनी या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांना पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग सचिव पदी नियुक्ती करावी अशी मागणी सर्व दिव्यांग बांधवाकडून करण्यात आली आहे.

COMMENTS