Homeताज्या बातम्या

बेलापूर बायपासवरील गतिरोधकाचे काम पूर्ण

बेलापूर : येथील श्रीरामपूर-बेलापूर ते नगर रस्त्यावरील बेलापूर बायपास येथे गतिरोधक टाकण्याचे काम ठरल्यानुसार पूर्ण करण्यात आले. जिल्हा रस्ता सुरक्

गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
रस्त्यांवरील बॅनरबाजीला लगाम; नियमभंग केल्यास कारवाईचा इशाराजिल्हा वाहतूक शाखेची युवकांसोबत बैठक; परवानगीशिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना
‘ ड्रंक  अँड ड्राईव्ह’विरोधात कारवाई; पाच वाहनचालकांवर गुन्हे


बेलापूर : येथील श्रीरामपूर-बेलापूर ते नगर रस्त्यावरील बेलापूर बायपास येथे गतिरोधक टाकण्याचे काम ठरल्यानुसार पूर्ण करण्यात आले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने मंजूर केलेले उपविभागातील हे पहिलेच अधिकृत गतिरोधक ठरले आहेत.
अति रहदारीच्या या रस्त्यावरील सदर ठिकाण हे अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी गतिरोधक टाकावेत अशी मागणी जिल्हा टॅक्सी अससोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांचेसह बेलापूर ग्रामपंचायतीने केली होती. सदरच्या प्रस्तावास जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने मंजुरी दिल्यावर त्वरित काम करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपाभियंता बापूसाहेब वराळे यांनी दिले होते.
त्यानुसार सदरचे काम करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता निलेश आसने यांचेसह पोलीसहेड कॉन्स्टेबल कोळपे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.जनभावना लक्षात घेऊन सदरचे काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागास धन्यवाद देण्यात येत आहेत.

COMMENTS