भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

Homeताज्या बातम्यादेश

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्षाने घाटलोडिया मतदारसंघामधून विजयी झालेले आमदार भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. भाजपच्या आमदार

मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
भाजपचा आमदार फुटला… ‘या’ पक्षात केला प्रवेश
इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा

भारतीय जनता पक्षाने घाटलोडिया मतदारसंघामधून विजयी झालेले आमदार भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्रसिंह तोमर यांनी ही घोषणा केली.गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवरयेऊन ठेपली असताना मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनतापक्ष आता कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचीही नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेतहोती. मात्र, त्यांना डावलून भाजपने भूपेंद्र पटेल यांना संधी दिली आहे. विजयरुपाणींचा राजीनामा जितका आश्‍चर्यकारक होता, तितकीच ही निवडदेखील आश्‍चर्यकारकमानली जात आहे.

मोदी-शहांचे निकटवर्तीय भूपेंद्र पटेल

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सिव्हीलइंजिनीअर असलेले 59 वर्षीय भूपेंद्र पटेल यांनी 2017 मध्ये घाटलोडिया मतदारसंघातून गुजरात विधानसभा निवडणूक जिंकली. त्यात त्यांनी काँग्रेसचेउमेदवार शशिकांत पटेल यांना तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. अहमदाबाद महापालिकेचे अध्यक्ष आणि अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचेही अध्यक्ष होते.

भूपेंद्र पटेलांसमोरील आव्हाने

मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले भूपेंद्र पटेल यांच्या समोर गुजरातची विधानसभा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. त्यातच सुरतसह अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांंच्या आम आदमी पक्षाने भाजपला टक्कर देण्याइतकी ताकद उभी केली आहे. गुजरातमध्ये बदलाचे वारे वाहत असून सत्ताविरोधी वातावरण असल्याची चुणूक काही सर्वेक्षणांतून दिसून आली आहे. अशा परिस्थितीत भाजपची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भूपेंद्र पटेल यांच्यासमोर असेल.

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र

गुजरातचा मुख्यमंत्री निवडताना भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला. कारण मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय,उपमुख्यमंत्री राहिलेले नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, प्रफुल्ल पटेल अशी अनेक नावे चर्चेत होती. शेवटी या नावांची फक्त चर्चाच ठरलीय. कारण भाजपनं एकदम नवा चेहरा पुढे आणला. भूपेंद्र पटेल यांचे नाव एकदाही चर्चेत आले नव्हते.

COMMENTS