Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आजी खेळाडूचे पालकत्व स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा ः प्राचार्य चौरे

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जतच्या कै. दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुलातील माजी खेळाडूंकडून आजी खेळाडूंचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. कर्जत येथील कै. दि

नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर
“माझे रेशन माझा अधिकार ” शिवसेनेने केला मंच स्थापन
शेवगावमध्ये राजीव राजाळे बुक फेस्टिवलचा समारोप

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जतच्या कै. दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुलातील माजी खेळाडूंकडून आजी खेळाडूंचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. कर्जत येथील कै. दिलीपनाना व कै. भास्करदादा तोरडमल क्रीडा संकुलातील माजी खेळाडू यांनी आजी खेळाडूचे पालकत्व स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा पाडला असून,तो  वाखणण्याजोगा आहे. असे वक्तव्य चापडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राजकुमार चौरे यांनी केले.
                  ग्रामीण भागातील खेळाडूंना परिस्थिती अभावी पुढे खेळता येत नसल्याने आपल्या काळातील अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ही वेळ ग्रामीण भागातील गरीब खेळाडूंवर येऊ नये. या उद्देशाने कै. दिलीपनाना तोरडमल व कै. भास्कर दादा तोरडमल क्रीडा संकुलाच्या वतीने माजी खेळाडू वैभव राऊत व राहुल मांडगे यांनी एका खेळाडूंचे पालकत्व स्वीकारले आहे.या कार्यक्रमाला सर्व सामाजिक संघटनेचे अनिल तोरडमल, विशाल मेहेत्रे, काकासाहेब काकडे, महादेव तांदळे, रवींद्र जगदाळे, संभाजी नांगरे, उद्योजक अमित तोरडमल, क्रीडा संकुलाचे मार्गदर्शक तथा बहिरोबावाडीचे माजी सरपंच विजयकुमार तोरडमल, क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक ईश्‍वर तोरडमल, संकुलातील खेळाडू  यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

COMMENTS