सुखराम यांच्यामुळेच…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सुखराम यांच्यामुळेच…

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे टेलिग्राम घोटाळ्यामुळे नुसते चर्चेतच राहिले नाहीत तर त्यामुळे त्यांचे राज

द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
कामगारांनी स्वत:च्या हितासाठी निर्णय घेण्याची घडी
शिवसेनेचा घसरता आलेख

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे टेलिग्राम घोटाळ्यामुळे नुसते चर्चेतच राहिले नाहीत तर त्यामुळे त्यांचे राजकीय करियर सुद्धा उध्वस्त झाले. भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे काम पंडित सुखराम यांनीच केले. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. मोबाईलचा शोध तसा  मार्टिन कूपर आणि त्यांचे तीन साथीदार या अमेरिकन शास्त्रज्ञाने 1973 ला लावला. पहिला मोबाईल हा 2 kg इतक्या वजनाचा होता. १९७३ ला प्रथम मोबाईलची कल्पना जगासमोर आली आणि संवादाची परिभाषा बदलली. 1983 नंतर मोबाईल लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला.
मोबाईलचा शोध हा दूर ध्वनी करण्याच्या उद्देशाने लावला होता. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला आणि मोबाईलने नाव- नवीन रूप धारण केले.
1983 नंतर प्रथम मोबाईल बाजारात विकण्यासाठी येऊ लागले, परंतु तेव्हा ते केवळ अमेरिका ह्या देशातच विक्रीसाठी तत्पर होते. भरतात पहिली मोबाईल सेवा ही 1995 मध्ये, म्हणजे मोबाईलचा शोध लागल्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर सुरू झाली. पंडित सुखराम हे 1993 ते 1996 या काळात दूरसंचार मंत्री होते.  भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाइल फोनमधून कॉल करण्यात आला . हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. त्यानंतर भारतात टेलिकॉम क्षेत्र विस्तार गेले. याचे सर्व श्रेय सुखराम यांनाच जाते. मात्र सुखराम यांनी यात अखेर घाण करून टाकली आणि त्यांच्या राजकारणाला कलंक तर लागलाच पण त्यांचे राजकीय अस्तित्वच मर्यादित राहिले. पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार असताना दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील घरावर सीबीआयचा छापा पडला होता. त्यावेळी सीबीआयला त्यांच्या घरातून नोटांनी भरलेले सूटकेस, बॅग आढळून आहे. दरम्यान जवळपास 4 कोटी रुपये सापडले होते. एवढे पैसे कुठून आले, याचे उत्तर सुखराम यांना देता आले नाही. बेकायदेशीरपणे खासगी कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांना ही रक्कम मिळाली होती. या सीबीआय धाड प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांनीच सुखराम यांना अडकवल्याची चर्चा झाली. सीबीआयने अटक केल्यानंतर सुखराम यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. याच प्रकरणात वर्ष 2002 मध्ये त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मंत्रीपदाचा दुरुपयोग करत त्यांनी एका खासगी कंपनीला कच्चा माल पुरवठा करण्याचे कंत्राट दिले. मात्र, यामुळे सरकारला 1.66 कोटींचे नुकसान झाले होते. सुखराम यांचे राजकीय करियर 1963 मध्ये सुरु झाले होते. ही सुरुवात हिमाचल प्रदेशमधून केली. त्यांनी पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती. वर्ष 1963 ते 1984 या काळात ते आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि राजीव गांधी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. 1996 मध्ये मंडीतून पुन्हा विजयी झाले आणि दूरसंचार मंत्री झाले. दूरसंचार घोटाळ्यानंतर काँग्रेसने पक्षातून काढल्याच्या पुढे त्यांनी 1997 मध्ये हिमाचल विकास काँग्रेसची स्थापना केली. 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून सरकारमध्ये सामील ते झाले. सुखराम यांच्यासह त्यांचे पाच आमदार मंत्री झाले हेते. त्यांचा मुलगा अनिल शर्मा 1998 मध्ये राज्यसभेवर निवडून आला. वर्ष 2003 मध्ये मंडीतून सुखराम पुन्हा विजयी झाले आणि यावेळी मात्र त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. 2017 मध्ये पुन्हा सुखराम यांनी आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु दोन वर्षांत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घर वापसी’ केली. ते अद्यापपर्यंत. सुखराम शर्मा यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री उशिरा पंडित सुखराम शर्मा यांची प्राणज्योत मालवली. सुखराम यांच्या मोबाइल क्रांतीपेक्षा त्यांचा घोटाळा लोकांच्या कायम लक्षात राहिला हे खरे असले तरी आज आपल्या हातात मोबाईल आहे तो सुखराम यांच्यामुळेच…  

COMMENTS