बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जोपासत इयत्ता 10 वी आणि 1

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जोपासत इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी गुणगौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक आहे. अपयशाला न घाबरता पुढील ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते, असे ही ते म्हणाले. तसेच पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग अधिक सुलभ होत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात अंबाजोगाई शहराचे नांव महाराष्ट्रात उंचावण्याचे काम यावर्षी ही गुणवंत विद्यार्थ्यांनी केले आहे. या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक वैभवात भर टाकण्याचे काम श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयी, सुविधा आणि नव्या जगात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यांच्यासह सर्वच शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जोपासत आज आपण इयत्ता 10 वी आणि 12 वी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत आहोत. या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे असे संस्थापक सचिव मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई शहर व स्थानिक परिसरातील इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव बुधवार, दिनांक 13 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा व यशाचा गौरव करण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मिटींग हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अंबाजोगाई श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक प्रा.वसंतराव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती अंजली संजय लोहिया (मुख्याध्यापक, बालनिकेतन विद्यालय, अंबाजोगाई) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर उपस्थित गुरूजणांचे स्वागत करण्यात आले. यानंतर खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आदित्य जिजाराम कावळे (100 टक्के), ऋत्विज दत्तात्रय कुलकर्णी (100 टक्के), कौस्तुभ ज्ञानेश मातेकर (99.60 टक्के) तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचे सृष्टी तुकाराम खरटमोल (94.20 टक्के), रेणुका कैलास मंगे (91.20 टक्के), श्रावणी अमोल हारे (90.80 टक्के), अजित संजय पवार (86.80 टक्के), रितेश लक्ष्मण काळे (86 टक्के), साक्षी विजय आदमाने (84.40 टक्के), समिक्षा विलास लोखंडे (84 टक्के), निरजा बाबासाहेब ढवारे (82 टक्के), साक्षी सुशील चव्हाण (82 टक्के), श्रावणी इंद्रजित कुसळे (82 टक्के), जोधाप्रसादजी मोदी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सिध्दी भुषण मोदी (प्रथम), वरद अनंत केंद्रे (द्वितीय), जानकी जयस्वाल (तृतीय) तसेच जोधाप्रसादजी मोदी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतील बुशरा इब्राहिम परसुवाले (प्रथम), सादील मोहम्मद गवळी (द्वितीय), रामेश्वरी चंद्रकांत गायके (तृतीय) या गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून आणि शाल, पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी केले. तर सुत्रसंचालन राजेश कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार आंबाड सर यांनी मानले. यावेळी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुषण मोदी, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, पत्रकार ज्ञानेश मातेकर, राजेश कांबळे, नाना गायके, कैलास मंगे, दत्तात्रय कुलकर्णी, नीना सोनवणे, अश्विनी उगीले, मेघा अकोलकर, वर्षा गुळवे, राजाभाऊ होके, रामेश्वर माले, बुधाजी खरात, रामचंद्र कागणे, गजानन मुळे, रामचंद्र इंगळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS