Homeताज्या बातम्या

प्रवीण दरेकरांवरील कारवाईला वेग

मुंबै बँक फसवणूकप्रकरणी मुंबई पोलिसांनी केली चौकशी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांत गृह विभाग भाजप नेत्यावर कारवाई लवकर करत नसल्यामुळे शिवसेनेकडून गृहखात्याचे वाभाडे काढण्यात आले होते. त्

देशाच्या इंधन साधनाची नवी गोळाबेरीज !
…तरच, मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज का हे समजेल ः खेडेकर
एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांत गृह विभाग भाजप नेत्यावर कारवाई लवकर करत नसल्यामुळे शिवसेनेकडून गृहखात्याचे वाभाडे काढण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी मुंबै बँक फसवणूकप्रकरणी मुंबई पोलिसांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी केल्यामुळे दरेकरांच्या समोरील अडचणीत वाढ होणार आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची चौकशी केली. यानंतर बोलतांना दरेकर म्हणाले की, सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला आहे. माझ्यावर कार्यवाही करण्याचा सरकारचा दबाव आहे आणि मी या प्रकरणात चौकशीला सामोरे जाणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मी या प्रकरणात संपुर्ण सहकार्य करणार असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

COMMENTS