सुपा : पत्रकार तथा संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील यांना राज्यस्तरीय ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श संपादक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आष्टी तालुका मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद यांच्या वतीने आयोजित विशेष समारंभात सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते देण्यात आला. समाजाभिमुख पत्रकारिता, सत्यनिष्ठ वृत्तांकन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संपादक सुरेश खोसे पाटील यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असल्याची भावना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची दखल घेऊन दिलेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून भविष्यात अधिक जोमाने, निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करण्याची प्रेरणा आहे. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा आणि संस्कारांचा आदर्श समोर ठेवून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.”हा सन्मान मिळाल्याबद्दल सुरेश खोसे पाटील यांच्यावर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावेळी ज्येष्ठ उद्योजक एन बी धुमाळ , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तान्हाजी जंजीरे , माजी जिल्हाध्यक्ष सिताराम पोकळे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

COMMENTS