Homeताज्या बातम्याबीड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळीतील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांची तपासणी पूर्ण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश



मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सोलापूर दक्षिण पंचायत समितीच्या विशेष पथकाने दि. 26 एप्रिल ते 15 मे या कालावधीत परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामांची पाहणी केली.
राज्यभर राबविण्यात येणार्‍या या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीद्वारे मूल्यमापन करण्यात आले. निवडलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट देऊन शासनाच्या निकषांनुसार विकासकामांचे गुणांकन करण्यात आले. 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत ग्रामपंचायतींनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान समितीने विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, स्थळभेटी, लाभार्थ्यांशी संवाद तसेच सेवा वितरण प्रणालीची तपासणी केली. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत प्रशासन, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, व्यायामशाळा, धार्मिक स्थळ विकास, आरोग्य उपक्रम, घरकुल योजना, वृक्षलागवड, पांदण रस्ते आणि अंतर्गत रस्ते यांसह ग्रामपंचायतींच्या विविध नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायतींनी राबविलेल्या उपक्रमांची गुणवत्ता, सातत्य, लोकसहभाग आणि परिणामकारकता या निकषांवर आधारित गुणांकन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. परळी वैजनाथ तालुक्यातील एकूण 90 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला. यात टोकवाडी, नाथरा, नागापूर, वडगाव दादाहारी, बोधेगाव, मलनाथपूर, तळेगाव, गाढे पिंपळगाव, रेवली, भिलेगाव, नंदनज, सारडगाव, पिंपरी बु., धर्मापुरी, नंदागौळ, जिरेवाडी, टाकळी देशमुख आणि वडखेल ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींसाठी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख रुपये तसेच दोन विशेष पारितोषिके प्रत्येकी 5 लाख रुपयांची आहेत. जिल्हास्तरावर प्रथम 50 लाख, विभागीय स्तरावर प्रथम 1 कोटी तर राज्यस्तरावर प्रथम 5 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभियानामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोलापूर दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या पथकासोबत परळी वैजनाथ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी साहेबराव भताने आणि बी.एम. उमाकांत गोदाम उपस्थित होते.

COMMENTS