Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भारताला नरक म्हटल्याने काँगे्रस आक्रमक; 140 कोटी भारतीयांचा अवमान म्हणत पंतप्रधान मोदींवर केली टीका

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ असा केल्याच्या वक्तव्यावरून देशातील राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उ

जपान इतर देशांना घातक शस्त्रे विकणार
दिल्लीचे नवे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू; ट्रम्प यांच्याकडून विशेष अभिनंदन
अमेरिका-इराण चर्चा ठरली निष्फळहोर्मुझ, अण्वस्त्र आणि सार्वभौमत्वावरून तणाव शिगेला
Trump Calls India Hell; Congress Slams PM Modi Inspiration

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ असा केल्याच्या वक्तव्यावरून देशातील राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. भारताबाबत केलेले हे विधान केवळ टीका नसून 140 कोटी भारतीयांचा आणि देशाच्या समृद्ध परंपरेचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निंदनीय आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा, विविधतेचा आणि विचारपरंपरेचा अपमान करणारे हे वक्तव्य आहे. त्यांनी असा आरोपही केला की, पंतप्रधानांनी यापूर्वी परदेशात केलेल्या काही वक्तव्यांमुळे भारताबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण झाली असून, त्यातूनच अशा टिप्पणींना अप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली असावी. सावंत यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले की, जगाने भारताचा शोध घेत असताना अनेक प्रवासी इतर खंडांपर्यंत पोहोचले. त्यामुळे भारताचे ऐतिहासिक आणि बौद्धिक स्थान जगात वेगळे आहे. त्यांनी नमूद केले की, भारत हा अध्यात्म, नैतिकता आणि विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणारा देश आहे. हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन या प्रमुख धर्मांची उगमभूमी म्हणून भारताची ओळख असून, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव जगभर पडला आहे. अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनीही समानतेसाठीच्या लढ्यात गांधींच्या विचारांचा आधार घेतला, असे त्यांनी अधोरेखित केले.

आमदार गायकवाडांच्या वर्तनावर प्रश्‍नचिन्ह
याचवेळी सावंत यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड यांच्यावरही टीका केली. प्रकाशकाला दिलेल्या धमकीच्या प्रकारावरून संबंधितांच्या वर्तनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. एकूणच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका विधानामुळे देशांतर्गत राजकारण पुन्हा तापले असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.

COMMENTS