नांदेड : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्

नांदेड : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवारी नांदेडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत महिला लोकप्रतिनिधींविषयी अवमानकारक भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनातील महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मांडली. यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, राजकीय मतभेद असू शकतात; मात्र त्यासाठी महिलांविषयी खालच्या पातळीवरील वक्तव्य करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. अशा प्रकारची भाषा तातडीने थांबवावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात माजी आमदार तथा शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, शिरीष देशमुख गोरठेकर, मन्नान चौधरी, कैलास देशमुख गोरठेकर, लक्ष्मीकांत पदमवार, मीनाक्षीताई कागडे, साहेबराव धनगे, नगरसेवक साबेर चाऊस, हबीब बावजीर, सुनील नानवटे, कन्हैया कदम, बालाजी शिंदे, स्वप्निल इंगळे, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, श्रीधरराव नागापूरकर, निलेश जाधव, मोहसिन खान पठाण, सुनंदाताई जोगदंड, सुरेखाताई पाटील, नेताजीराव भोसले, अभिषेक लुटे, जयश्रीताई पाटील, संतोष क्षीरसागर, माधव पाटील चिंचाळे, अर्जुन शिरसागर, गणेश तादलापूरकर, मनोहर पाटील भोसीकर, देवेंद्र मोतेवार, संभाजी पाटील मुकनर, बाबुराव कदम बिल्लाळीकर, छत्रपती स्वामी, श्रीनिवास पाटील नरवाडे, सुरेश रेनगुणवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS