Homeताज्या बातम्यामनोरंजन

सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला शाहरुख खानने केली धक्काबुक्की

मुंबई प्रतिनिधी - शाहरूख खान सध्या पठाणमुळे चर्चेत आहे. येणाऱ्या जवान सिनेमासाठी शाहरूखचे फॅन्स उत्साही आहेत. चाहत्यांच्या प्रेमानंच मला बॉलिव

‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल
शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट

मुंबई प्रतिनिधी – शाहरूख खान सध्या पठाणमुळे चर्चेत आहे. येणाऱ्या जवान सिनेमासाठी शाहरूखचे फॅन्स उत्साही आहेत. चाहत्यांच्या प्रेमानंच मला बॉलिवूडचा बादशाहा बनवलं आहे, असं शाहरूख खान अनेकदा म्हणाला आहे. पण त्याचं हे वाक्य तोच विसरला असल्याचं समोर आलं आहे. मुलाखतीत बोलून दाखवणं आणि सत्यात तसं वागणं याच फार मोठा फरक आहे. माझ्या चाहत्यांमुळे मी मोठा अभिनेता झालोय असं म्हणणाऱ्या शाहरूख खाननं त्याच्या चाहत्याला दिलेली वागणूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला शाहरूखनं धुडकावून लावलं. त्याची ही कृती कॅमेरात कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेक जण वाट पाहत असतात. अशातच मुंबई एअरपोर्टवर घडलेल्या प्रकारानंतर शाहरूखवर चाहत्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे. शाहरूख खान मुंबई एअरपोर्ट आला. त्याला पाहण्यासाठी एअरपोर्ट बाहेर मोठी गर्दी झाली होतीय या गर्दीत असलेला एक चाहता शाहरूखबरोबर सेल्फी घेण्यासाठी आला. मात्र शाहरूखनं त्याचा धुडकावून लावलं.

COMMENTS