Homeताज्या बातम्या

पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्या; खासदार डॉ. अजित गोपछडे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

नांदेड : महाराष्ट्रातील 2025 च्या अतिवृष्टी व भीषण पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक पॅक

भेसळखोरांवर एफडीएचा दणका! २ महिन्यांत नांदेडच्या दूध संकलनात २२ हजार लिटरची घट
कुंडलवाडी शहर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले; देवशयनी एकादशीनिमित्त भव्य हरिनाम मिरवणूक
रोटरी क्लबचे हरित बीडकडे आणखी एक पाऊल; ३५० देशी वृक्षांचे रोपण

नांदेड : महाराष्ट्रातील 2025 च्या अतिवृष्टी व भीषण पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. यासोबतच तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबच्या लंगर सेवेला जीएसटीमधून पूर्ण सूट आणि धर्माबाद रेल्वे स्थानकाच्या नामकरणाबाबत स्वतंत्र निवेदनेही त्यांनी सादर केली.

नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत डॉ. गोपछडे यांनी महाराष्ट्रातील पुरामुळे शेती, सिंचन प्रकल्प, ग्रामीण व शहरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट (झऊछ-) ची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावून राज्याला आवश्यक आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सध्या 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर विचार सुरू असल्याने, पीडीएनए अहवालाच्या आधारे महाराष्ट्राला आपत्ती जोखीम कमी करणे, हवामान बदलाशी सुसंगत विकास, शमन उपाययोजना आणि पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

याशिवाय, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब येथे 24 तास सुरू असलेल्या मोफत लंगर सेवेसाठी लागणार्‍या धान्य व अन्य साहित्याला संपूर्ण जीएसटी सूट द्यावी आणि गुरुद्वारा बोर्डाचा केंद्र सरकारच्या ’सेवा भोज योजना’ अंतर्गत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मूळ गाव कंदकुर्ती (ता. धर्माबाद) चे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक असे करण्याची मागणीही त्यांनी केली. भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर करण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून संबंधित विभागांमार्फत आवश्यक ती सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. गोपछडे यांनी सांगितले.

COMMENTS