Homeताज्या बातम्या

कोयंबतूर-जयपूर विशेष रेल्वेच्या आठ फेर्‍या; नांदेड विभागातील सहा स्थानकांवर थांबा

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्र.06181/06182) तात्पुर

गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश
भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचे मुख्य कारण; आमदार सत्यजित तांबे यांची व्यवस्था आणि सरकारवर घणाघाती टीका
’शाम-ए-रफी’ गायन स्पर्धेत मज़हरुद्दीन शेख सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित; बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
दक्षिण मध्य रेल्वे

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्र.06181/06182) तात्पुरत्या स्वरूपात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेच्या एकूण आठ फेर्‍या होणार असून, नांदेड विभागातील प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ही विशेष रेल्वे एलएचबी रचनेतील 20 डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक 06181 कोयंबतूर-जयपूर विशेष ही 13 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रत्येक गुरुवारी धावेल. ही गाडी कोयंबतूर येथून पहाटे 2.30 वाजता सुटून शनिवारी दुपारी 1.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल. या मार्गावर एकूण चार फेर्‍या होणार आहेत. गाडी क्रमांक 06182 जयपूर-कोयंबतूर विशेष ही 16 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रत्येक रविवारी धावेल. जयपूर येथून रात्री 10.05 वाजता सुटणारी ही गाडी बुधवारी सकाळी 8.30 वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. या मार्गावरही चार फेर्‍या होणार आहेत. ही विशेष रेल्वे मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम आणि अकोला या नांदेड विभागातील स्थानकांवर थांबणार असल्याने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, रेल्वे आरक्षण केंद्रे किंवा ठरळश्रजपश पचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. विशेष गाडीचे सविस्तर वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केले असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खातरजमा करून नियोजन करावे, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

COMMENTS