Homeताज्या बातम्या

‘आता थांबायचं नाही’ सिनेमासाठी सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर पुरस्कार; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : नुकताच ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या सोहळ्यानिमित्त बड्या कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. या खास सोहळ्य

रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
माहिती दडपून भ्रष्टाचार लपविण्याचा आरोप; मुख्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ राकेश साळवे आमरण उपोषणावर
‘कोटा एक्सलन्स’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; नीट परीक्षेत प्रतीक खरमाटे आणि अल्फिया शेखचे दैदीप्यमान यश
Siddharth Jadhav winning Best Supporting Actor trophy: Filmfare Awards  Marathi 2026: सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर पुरस्कार! फोटो व्हायरल

मुंबई : नुकताच ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या सोहळ्यानिमित्त बड्या कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. या खास सोहळ्यात मराठी कलाकारांचा गौरव करण्यात आला. शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाही’ या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. २०२५ साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव सारखे जबरदस्त कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही या सोहळ्यात पुरस्कार मिळाला असून त्याने पुरस्कार मिळाल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.

‘आता थांबायचं नाही’ हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, दिग्दर्शक, डायलॉग, संगीत, गायक आणि सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले. या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेता म्हणून अभिनेता सिद्धार्थ जाधवचा विशेष सन्मान करण्यात आला.

सिद्धार्थ जाधवचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर अभिनेत्याने खास पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या फोटोत सिद्धार्थ जाधव बेडवर असून, त्याच्या शेजारी ब्लॅक लेडी अर्थात फिल्मफेअरचा अवॉर्ड दिसत आहे. एका फोटोमध्ये सिद्धार्थ फिल्मफेअर पुरस्काराकडे पाहत आहे. सिद्धार्थ या फोटोंमध्ये प्रचंड आनंदित दिसत असून त्याने फोटो शेअर करून खास लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे.

सिद्धार्थ जाधवने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘सुपरहॅपी….wowowowowo..थँक्स फिल्मफेअर.. ‘आता थांबायचं नाही’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्यासाठी पुरस्कार. ‘आता थांबायचं नाही’ या टीमचे मनापासून आभार. लव्ह यू फॉरेव्हर’. सध्या सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर गौरव मोरे, प्रिया बापट, कुशल बद्रिके, भाग्यश्री मोटे यांसह इतर दिग्गज कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

COMMENTS