Homeताज्या बातम्या

चॉकलेटने घेतला बाळाचा जीव 

रत्नागिरी प्रतिनिधी - न कळत्या वयातील लहान मुलांची काळजी घेणं हे आवश्यक असतं, त्याकडे जराही दुर्लक्ष झाल्यास ते जीवावर बेतू शकतं. असाच एक दुर

दिव्यांग म्हणजे सकारात्मकता ऊर्जा स्रोत, दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासन सदैव तत्पर:-  मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल
सभा दणाणल्या, माणूस हरवला!
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

रत्नागिरी प्रतिनिधी – न कळत्या वयातील लहान मुलांची काळजी घेणं हे आवश्यक असतं, त्याकडे जराही दुर्लक्ष झाल्यास ते जीवावर बेतू शकतं. असाच एक दुर्दैवी प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घडला आहे. गुहागर तालुक्यात साखरी आगरी येथे अवघ्या एका नऊ महिन्याच्या बाळाचा घशात जेली चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जेली चॉकलेट हे या बाळाने उचलून तोंडात घातले आणि ते चघळत असतानाच काही वेळाने हे चॉकलेट या बाळाच्या गळ्यात अडकलं. त्यामुळे त्याचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ते अस्वस्थ झाले ही बाब त्याच्या आईच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली होती. गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथील रिहांश तेरेकर असे या बाळाचे नाव आहे. या मुलाचे वडील हे कामानिमित्त मुंबई येथे असतात, तर आई गृहिणी आहे. आजी-आजोबा आणि आई असं कुटूंब गुहागर तालुक्यात आपल्या गावी साखरी आगर येथे वास्तव्यास आहे.

COMMENTS