Homeताज्या बातम्या

तरुण पिढीने समाजासाठी आदर्श बनावे : गिते

अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय, कोतुळ येथे "नशा मुक्त भारत अभियान" अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा

राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी गदारोळ; मल्लिकार्जुन खरगे यांच्या मनुस्मृती उल्लेखावरून खडाजंगी
अल्पसंख्याक मुस्लिम समाजावरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी शनिवारी बीडमध्ये जिल्हास्तरीय बैठक
कुकडी, सीना प्रकल्पांचा मंत्री विखे पाटील आज घेणार आढावा

अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय, कोतुळ येथे “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थी संघांचे उपाध्यक्ष, जेष्ठ पत्रकार सुनील गीते होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात सुनील गीते यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्त व व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले आणि तरुण पिढीने चांगल्या सवयी अंगीकारून समाजासाठी आदर्श बनावे, असे आवाहन केले. व्यसनाधीनते पासून विद्यार्थ्यांनी कायम दूर राहण्याची शपथ घ्यावी तरच देशाला निरोगी व सशक्त तरुण पिढी निर्माण होईल असे यावेळी गिते यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्य गोडे जे. बी. यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगितले. माजी प्राचार्य देशमुख बी. के.यांनी आपल्या मार्गदर्शनात “व्यायामाची नशा असावी, चांगल्या गोष्टीची नशा असावी वाईट गोष्टींची नशा करू नये असा प्रेरणादायी संदेश दिला. पर्यवेक्षक शिंदे टी. डी. यांनी नशेमुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पंडित पी. डी. यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि इतर विविध नशायुक्त पदार्थांबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख कोरडे एस. टी. यांनी केले. यावेळी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS