Homeताज्या बातम्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा; पाकिस्तानात खळबळ, सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकचे ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी केला आहे. इमरान खान यांचा तुरुंगात मृत्य

प्रियदर्शनी प्राथमिक व राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
पिंपळनेर परिसरात पावसाळी आजारांचा वाढतोय ‘ताप’; मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण दुपटीने वाढले
शिवणी येथे विवाहितेची आत्महत्या; घातपाताचा संशय
Imran Khan | पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तुरुंगात लैंगिक  अत्याचार? व्हायरल रिपोर्टचे नक्की सत्य काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकचे ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी केला आहे. इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यावर पाकिस्तान सरकारकडून कोणतीही अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे इमरान खान यांच्या मृत्यू बाबतचा सस्पेन्स वाढला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत एस. खान यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करत असल्याचं वजाहत खान यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याने कुणालाच त्यांना भेटू देत नसल्यांचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. वजाहत खान यांच्या दाव्याने पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी पाकिस्तान सरकारकडून अद्याप या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही. इमरान खान यांच्यावर अनेक केसेस सुरू आहेत. 2023 पासून ते पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. इमरान खान तुरुंगात असून त्यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही. इमरान खान यांची पार्टी तहरीक एक इन्साफ यांनीही वारंवार हा आरोप केला आहे. इमरान खान यांच्या बहिणीला किंवा कुटुंबीयांनाही त्यांना भेटू दिलं जात नाही. इमरान खान हे आजारी असल्याने त्यांच्या उपचाराबाबतचे हालहवालही विचारू दिले नसल्याचा पीटीआयचा दावा आहे. सध्या इमरान खान हे डोळ्यांच्या विकाराने त्रस्त आहेत. मंगळवारी पीटीआयने कोर्टाच्या बाहेर निदर्शने केली होती. इमरान खान यांच्यावरील खटले निकाली काढण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली होती. मात्र, कोर्टाच्या रजिस्टारने या प्रकरणांची पुढच्या आठवड्यात सुनावणी करू, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर पीटीआयने निदर्शने मागे घेतली होती. खान यांच्यावरील प्रकरणाची लवकर सुनावणी करने आणि त्यांना आरोग्य सुविधा देणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली होती. दरम्यान, यापूर्वीही इमरान खान यांच्या मृत्यूची अफवा उठली होती. इमरान खान यांच्या कुटुंबीयांना त्यांना तुरुंगात भेटू दिलं जात नव्हतं. त्यामुळे ही अफवा उठली होती. त्यानंतर पुन्हा एकदा इमरान खान यांच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सरकारने अद्याप अधिकृत काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे इमरान खान यांच्या मृत्यूबाबतचं गूढ वाढलं आहे.

COMMENTS