कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू नागपूर : नागपुरात भीषण अपघाताची घटना घडला आहे. यात मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनल

कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
नागपूर : नागपुरात भीषण अपघाताची घटना घडला आहे. यात मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. नागपुरात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातात मृत झालेले दोन्ही तरुण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. तर यातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (12 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाली असून कार किती भरधाव असेल यांचा अंदाज लागतोय. मिहीर आनंद बेहार, भौमिक अमोल लारोकर आणि सागर संजय मेलवाणी हे तिघे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. मिहीर हा वडिलांची कार चालवत होता. मित्र येण्यास वेळ असल्याने तिघेही कारमधून फेरफटका मारत होते. याचवेळी भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर बेहार जखमी झाला असून त्याच्यावर तारांगण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कळमना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘मुलं पालकांची मालमत्ता नाहीत, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नागपूर खंडपीठाने दिला आहे. प्रौढ मुलीने स्वतःच्या इच्छेने जीवनसाथी निवडला असल्यास तिचा ताबा परत मिळवण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका करता येणार नाही, असे देखील हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. नागपुरातील एक मुलगी 17 वर्षांची असताना शिकवणीसाठी घराबाहेर पडली. त्यानंतर एका तरुणासोबत गेल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा ताबा आईकडे दिला. मात्र ती पुन्हा घरातून निघून गेल्यानंतर आईने हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाने मुलीशी प्रत्यक्ष संवाद साधला असताना आपण स्वतःच्या इच्छेने आईची साथ सोडून तरुणासोबत गेल्याचं आणि त्याच्यासोबत राहण्याची इच्छा असल्याचं मुलीने सांगितलं सुनावणीदरम्यान मुलगी प्रौढ झालेली आहे. आपल्या जीवनसाथीची निवड करण्याचा तिला अधिकार असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण नोदवलं. अल्पवयीन असताना तरुणाने बेकायदा ताब्यात ठेवल्याचा आईचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. संबंधित तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याचाही आरोप करण्यात आला. मुलांच्या ताब्याच्या प्रकरणात पालकांच्या अधिकारांपेक्षा मुलांचं कल्याण सर्वोच्च असून सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा हायकोर्टाकडून आधार घेतला गेलाय. याचिकेत बेकायदा ताबा सिद्ध होणं आवश्यक तसा ताबा सिद्ध न झाल्याने नागपूर खंडपीठाकडून आईची याचिका फेटाळण्यात आली आहे.

COMMENTS