Homeताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा

पुणे : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्‍नांवरून केंद्रीय शिक

‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणालीअधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; कार सोडून देवेंद्र फडणवीस थेट दुचाकीवरून निवासस्थानाकडे रवाना!
महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध
CJP Protest : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नीट' (NEET) प्रवेश परीक्षेत


पुणे : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्‍नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. कॉकरोच जनता पक्ष अर्थात सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी 20 जूनपासून नवी दिल्लीत बेमुदत आंदोलन छेडण्याची घोषणा बुधवारी पुण्यातून केली असून, त्यापूर्वी देशातील विविध शहरांमध्ये जनजागृती आणि आंदोलनांची मालिका राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिपके यांनी सांगितले की, प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास पुण्यानंतर लखनौ, अमृतसर, बंगळूर आणि जयपूर येथे आंदोलनांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास 20 जूनपासून राजधानी दिल्लीत बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार असून, देशभरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिजीत दीपके यांनी आपण परदेशात स्थायिक होण्याचा विचार सोडून देशातच सामाजिक आणि राजकीय काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. भारतीय तरुणांमध्ये मोठी क्षमता असूनही त्यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशातील शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्‍वासार्ह होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर सुरू झालेली ही चळवळ येत्या काही दिवसांत अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता असून, सरकार या मागण्यांकडे कशा पद्धतीने पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न
आंदोलनाबाबत विविध प्रकारचे गैरसमज आणि अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप केला. 6 जून रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनात देशाच्या विविध भागांतील नागरिक स्वखर्चाने सहभागी झाले होते, असे सांगत त्यांनी आंदोलनासाठी पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप फेटाळून लावला. तसेच आंदोलनामुळे स्वतःला आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचाही दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे.
आंदोलनामागे परदेशी निधीचे आरोप फेटाळले
आंदोलनामागे कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक पाठबळ नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काहीजणांकडून दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय व्यापक जनसमर्थन उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS