Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर

डॉ. प्रतापसिंह जाधव कराड / प्रतिनिधी : उंडाळे, ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळ

पाटण तालुक्यात काँगे्रस शून्यातून विश्‍व निर्माण करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

कराड / प्रतिनिधी : उंडाळे, ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतीदिनानिमित्त 39 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शुक्रवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्‍वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्‍वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रा. धनाजीराव काटकर, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांची उपस्थिती होती. शुक्रवार, दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता स्व. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राजाराम महाविद्यालयात असताना त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेची स्थापना केली होती. त्याचे सरचिटणीस म्हणून त्यांनी नेतृत्व केले होते. सन 1965 च्या भारत-पाक युध्दात भारतीय जवानांनी लाहोर विमानतळावर कब्जा केला. त्यावेळी कोल्हापूरात विराट मोर्चा काढला होता. सन 1969 मध्ये त्यांनी दै.‘पुढारी’च्या कामकाजाची धुरा स्वीकारली.
मनिला (फिलिमाईन्स) येथे आशियाई संपादक परिषदेत भाग घेतला होता. लंडन येथील छ. शिवाजी महाराज यांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. राजर्षी छ. शाहू महाराज जन्मशताब्दीचे आयोजन त्यांनी केले होते. साहित्य, कला, क्रिडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. सियाचिन येथे सन 1999 मध्ये भारतीय जवानांसाठी सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले. ऐतिहासिक मराठा आरक्षणाच्या लढ्यात डॉ. जाधव यांनी नेतृत्वाची भूमिका पार पाडली.
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय स्वातंत्र सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले होते. 1973 पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्‍चात स्मारक समितीने अ‍ॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

COMMENTS