Homeताज्या बातम्यादेश

इच्छामरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ‘सर्वोच्च’ संकेत

नवी दिल्ली : मृत्यूपत्र बनवून ठेवलेल्यांना ‘सन्मानाने मृत्यू‘ मिळणे हा अधिकार आहे. मात्र, ज्या गंभीर आजारी रुग्णांना उपचार नको आहेत त्यांच्यासाठी

देसवंडी रस्त्याचा वाद आमदार तनपुरेंच्या मध्यस्थीने निकाली
पाटण-ढेबेवाडी मार्गावरील पूल पाण्याखाली तर कराडजवळ महामार्गावर पाणीच पाणी
राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी दिल्ली : मृत्यूपत्र बनवून ठेवलेल्यांना ‘सन्मानाने मृत्यू‘ मिळणे हा अधिकार आहे. मात्र, ज्या गंभीर आजारी रुग्णांना उपचार नको आहेत त्यांच्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी विधिमंडळांवर आहे अशी टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत 5 वर्षांपूर्वीच्या न्यायालयीन निकालात ‘अत्यंत सावधगिरी बाळगून’ बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील न्या. अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सी टी रविकुमार या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, आपल्याला सन्मानाने मृत्यू यावा अशी इच्छा असणारांचा अधिकार हा राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि कलम 21 (जगण्याचा अधिकार) मधील एक पैलू म्हणून या न्यायालयाने लक्षात घेतला आहे. इच्छामरणाबाबतचा निर्णय ‘व्यावहारिक’ असणे गरजेचे आहे. यासंदर्भात 2018 च्या न्यायालयीन निकालात रुग्णांच्या राहणीमानात मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी ’किंचित सुधारणा’ करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचा जीवनाचा अधिकार अधिक विस्तारित होईल. परंतु, खंडपीठाने याबाबत म्हटले की विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे गुंतागुंतीची आहेत आणि त्यांचे सुलभीकरण आवश्यक आहे. त्याच वेळी यात अत्यंत सावधगिरी बाळगून त्यांचा गैरवापर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.  याबाबतच्या याचिकेत मरणासन्न रुग्णांची जिवंत न रहाण्याची इच्छा व तिला सन्मान देण्याची मागणी करण्यात आली. गंभीर आजारी असलेले अनेक रुग्ण हेही सांगू शकत नाहीत की त्यांचे उपचार थांबवावेत असे याचिका कर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रशांत भूषण यांनी नमूद केले. सध्याच्या तीन टप्प्यातील कठीण अटींच्या प्रक्रियेमुळे 2018 चा निकाल निरर्थक ठरल्याचाही युक्तिवाद दातार यांनी केला. त्यावर वर्तमान प्रक्रिया सुलभ करण्याची गरज असल्याचे खंडपीठाने मान्य केले.  2018 च्या निकालानुसार एखादी प्रौढ व्यक्ती जिवंतपणी (इच्छामरणाबाबतचे) इच्छापत्र (मृत्यूपत्र) बनवू शकते. दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत त्यावर संबंधिताची स्वाक्षरी घेतली जाते आणि ते मृत्यूपत्र न्यायदंडाधिकार्यांनी प्रमाणित केलेले असते. असे मृत्यूपत्र करणारा गंभीर आजारी असल्यास आणि बरे होण्याची आशा नसताना दीर्घकाळापर्यंत वैद्यकीय उपचार घेत असल्यास डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीनुसार वैद्यकीय मंडळाची (बोर्ड) स्थापना करावी. हा रुग्ण बरा होण्यास वाव आहे की तो ‘ब्रेन डेड’ स्थितीत पोचला आहे, हे संबंधित मंडळ सांगेल.यानंतर जिल्हा अधिकारी स्वतंत्र वैद्यकीय मंडळ स्थापन करतील. दुसर्‍या मंडळाच्या संमतीनंतर हे प्रकरण न्यायदंडाधिकार्‍यांकडे जाईल. दुसरीकडे रुग्णालयाने वैद्यकीय उपचार मागे घेण्यास परवानगी नाकारल्यास त्या रुग्णाचे नातेवाईक उच्च न्यायालयात जाऊ शकतात. तेथेही न्यायालयाच्याच आदेशाने वैद्यकीय मंडळाची स्थापना केली जाईल.

COMMENTS